शासकीय जागेत अतिक्रमण करून अवैध दारू विक्री ..

माढा, ६ ऑगस्ट २०२०: कान्हापुरी ता पंढरपूर ते बेंबळे ता माढा या रोडवरती कान्हापुरी हद्दीतील पाटबंधारे विभागाच्या शासकीय जागेत एका इसमाने अवैधरित्या अतिक्रमण करून तेथे बेकायदेशीररित्या दारू विक्री करतो आहे. यामुळे येथिल देशमुख वस्तीवरील नागरिकांना तळीरामांचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे येथिल नागरिकांनी पाटबंधारे विभागाला लेखी तक्रार केली असून संबंधित व्यक्तीवर कारवाई न झाल्यास १५ अॉगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे.

सविस्तर वृतांत असा की, मौजे कान्हापुरी येथिल ६५/१ मधील पाटबंधारे भूसंपादित जागेत एका इसमाने अनाधिकृत अतिक्रमण करून बेकायदेशीररित्या दारू विक्रीचा धंदा करतो आहे. पाटबंधारे पुलाजवळच त्याचा व्यवसाय असल्याने तेथील महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागतो या व्यवसायामुळे गावातील गोरगरीबांचे नुकसान झालेले आहे. तसेच तिथे राहणाऱ्या देशमुख वस्ती जनतेला त्याचा नाहक त्रास होतो. यामुळे अनेक तक्रारी करकंब पोलीस ठाण्यातही केल्या परंतु कोणतीही दखल घेतली नाही. सरते शेवटी पाटबंधारे विभागाच्या विभागीय आयुक्त, मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर तसेच कार्यकारी अभियंता पंढरपूर विभाग यांना सुध्दा लेखी अर्ज दिला आहे. परंतु उडवा उडवी उत्तरे देवून प्रकरण कानामागे टाकण्यात येत आहे.

सदर इसमाने शासनाच्या जागेवर पक्के बांधकाम चालू केले आहे. बेकायदेशीररित्या दारू विकणाऱ्या इसमास पाठीशी घालणारे पाटबंधारे अधिकारी श्री एम पी लोकरे यांना कर्तव्यात केले प्रकरणी तातडीने निलंबित करण्यात यावे, तसेच अनाधिकृत अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा चांद बादशाह मुलाणी व कान्हापुरी ग्रामस्थ जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर १५ अॉगस्ट पासून आमरण उपोषणास बसण्याचा पवित्रा घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा