चखालेवाडी, कर्जत येथे फॉरेस्ट विभागात अवैधरित्या मोबाईल स्टोनक्रशर चा वापर.

कर्जत,१५ जूलै २०२० : माळढोक अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्राच्या ४०० मी परिसरात मौ.चखालेवाडी, कर्जत येथील फॉरेस्ट विभागाच्या गट नंबर ४६ मध्ये चालू असलेले अनधिकृत मोबाईल स्टोन क्रशर व सर्व यंत्रसामुग्री तत्काळ जप्त करावी व पंचनामे करून संबंधितांवर कायद्यातील तरतुदीनुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी कर्जत तालुक्यातील रामदास सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या तक्रार अर्जात त्यांनी म्हटले आहे की, माळढोक वन्यजीव अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्रात चालू असलेले काम हे अनधिकृतरित्या चालू आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता मोठ्या क्षमतेचे मोबाईल स्टोनक्रशर मागवण्यात आले आहे. सदर क्रेशरचे काम वनविभागाच्या हद्दीच्या परिसरात ८० ते १०० मीटर अंतरावर चालू आहे. सदर स्टोन क्रशर हे लाखो ब्रास बोगद्याच्या मटेरियल क्रेशिंगचे काम करते. यात वापरल्या जाणाऱ्या मेटरियलच्या वाहतुकीसाठी अंदाजे २० ते ३० दहा टायर हायवा टिपर, रात्र आणि दिवस चालू आहेत.
मटेरियल टाकण्यासाठी तिथे दोन-तीन पोकलेन मशीन चालू आहेत. सदर क्रसिंग केलेले मटेरियल वाहतुकीसाठी लागणारा रस्ता हा वन विभागाच्या हद्दीतून जात आहे.

तरी शासनाच्या विविध नियमानुसार माळढोक अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्रात चालू असलेले अनधिकृत मोबाईल स्टोन क्रशर व तेथील हैवा ,डंपर, पोकलेन बंद करून वन नियमानुसार जप्त करावेत व कायद्यातील तरतुदीनुसार स्टोन क्रशर चालकावर, जागेच्या मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या शिवाय गुन्हेगार यांच्याकडून नियमानुसार दंड देखील वसूल करण्यात यावा अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली आहे.

पुढे ते हे देखील म्हणाले की, वरील कारवाईचे लेखी पत्र पुराव्यासह दोन दिवसात मला देण्यात यावे. अन्यथा मी आपणास सर्वांविरुद्ध, कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करेन, असा इशारा सूर्यवंशी यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अहमदनगर, उपवन संरक्षक अहमदनगर, उपवन संरक्षक भांबुर्डा पुणे, यांना दिल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा