विदर्भात पावसाची पुन्हा हजेरी, हवामान खात्याकडून पुढील चार दिवस यलो अलर्ट

मुंबई, १८ ऑगस्ट २०२३ : जुलै महिन्यात पहिल्या पंधरवड्यात राज्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली होती.आता राज्यात विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विदर्भातील अनेक भागांत पावसाचे आगमन झाले आहे. राज्यात पावसाने मोठी विश्रांती घेतली होती. त्यानंतर पाऊस आता सुरु झालेला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे, यामुळे शेतकऱ्यांची चिंता संपणार आहे. विदर्भासह मराठवाडा आणि खान्देशात शनिवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, औरंगाबाद, नांदेड, परभणीसह संपूर्ण विदर्भात १९ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट दिण्यात आला आहे.

विदर्भात १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर नागपुरमध्ये पावसाला सुरुवात झाली. नागपूरसह विदर्भात सर्वदूर पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावासाने पाठ फिरवल्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. परंतु आता पाऊस परतल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस राज्यात पुन्हा परतणार आहे. शुक्रवारपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा