बीड, दि. ८ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. यावर तोडगा काढण्याचे काम प्रशासन सतत करत आहे. वैद्यकीय सोयी – सुविधांची पाहणी करत असतांना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय येथे असलेली बेड ची कमतरता निदर्शनास आली. त्यामुळे आमदार नमिता मुंदडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाबाबत कार्यवाही करून बेड उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केलेली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, अंबाजोगाई येथे २५० बेड आहेत असे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र याठिकाणी रुग्णांसाठी १२० बेड आहेत आणि एक इमारत ज्यात ३० बेड आहेत. ते येथील डॉक्टर व स्टाफ यांना क्वारंटाईन झाल्यानंतर राहण्यासाठी आहे. यामुळे येथे रूग्णांना बेड उपलब्ध नसून त्यांना उपचार मिळण्यासाठी अडचण येत आहे.
याप्रकरणी आपण त्वरित योग्य ती कार्यवाही करावी आणि उपाययोजना करावी अशी विनंती आमदार नमिता मुंदडा यांनी आज दि. ८ ऑगस्टला बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड