वादळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या- धाराशीव काँग्रेस

धाराशीव २९ मे २०२४ : धाराशीव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. काही भागात बागांचे नुकसान झालेले आहे. घरांचे तसेच जनावरांचे शेड पडझड झाली आहे. यासंदर्भात आज जिल्हा काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस अशोक बनसोडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सलमान शेख, नंदू क्षीरसागर, अमोल पाटील यांच्या शिष्टमंडळाने धाराशिव तालुक्यातील सांगवी, ईर्ला तसेच तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ, कुंभारी या भागातील नुकसानग्रस्त शेतांचे व घरांची पाहणी केली. तसेच सांगवी येथील मयत शेतकरी कै. कोळपे यांचे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

काँग्रेस शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष सय्यद खलिल सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, सरचिटणीस अशोक बनसोडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शिलाताई उंबरे, सलमान शेख, नंदू क्षीरसागर, अमोल पाटील आदी हजर होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा