मुंबई, २३ ऑगस्ट २०२०: देशभरात दिड दिवसांच्या गणपती मूर्तींचं आज विसर्जन होत आहे. मुंबईसह राज्यभर आज मोठ्या संख्येनं घरगुती गणपतीचं विसर्जन घरीच होत आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेनं यासाठीची नियमावली जारी केली आहे.
घरगुती गणपती बसवणा-यांनी घरच्या घरीच विसर्जन करावं. थेट समुद्रात किंवा तलावात विसर्जन करता येणार नाही. महापालिकेनं गणपती मूर्ती संकलन केंद्रांचीही व्यवस्था केली आहे. मात्र विसर्जनापूर्वीचे विधी घरीच करण्यासही सांगण्यात आलं आहे. महापालिकेनं १६७ कृत्रिम विसर्जन तलावांचीही निर्मिती केली आहे.
सरकारी नियमांचे पालन करूनच गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहन केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी