नगर परिषद,महानगरपालिका व कटक मंडळाच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा

माढा ,६ जानेवारी २०२१ : राज्यातील नगर परिषद, महानगरपालिका व कटक मंडळाच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी शिक्षक सहकार संघटनेने मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड, राज्य उपाध्यक्ष निलेश देशमुख विभागीय अध्यक्ष मनोज कोरडे, रविकुमार अंबुले, अनिल बसुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
राज्यातील नगर परिषद, मनपा व कटक मंडळ च्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना बऱ्याच मनपात जुनी पेन्शन योजना चालु असुन काही मनप,नपा मध्ये मात्र जुनी पेन्शन योजना लागु केलेली नाही.प्रत्येक मनपात वेगवेगळे निर्णय असुन त्याबाबत एकवाक्यता कुठेही दिसुन येत नाही.त्यामुळे काही मनपा ,नगर परिषद ,कंटक मंडळांच्या शाळेतील शिक्षकांना नवीन किंवा जुनी यापैकी कोणत्याही प्रकारची पेन्शन लागू नसुन कोणत्याही प्रकारची कपात सुद्धा होत नाही.पेन्शन मिळावी म्हणून शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्यासह अनेक संघटना व संघटनांचे पदाधिकारी यांनी अनेकदा निवेदने देऊनही शासन निर्णय घेत नाही.
याबाबत तातडीने निर्णय घेऊन सर्व मनपा ,नगर परिषद ,कटक मंडळातील १ नोव्हेंबर २००५ नंतरील शिक्षकांना एकच १९८२ /८४ ची जुनी पेन्शन योजनाच लागु करुन भविष्य निर्वाह खाते सुरू करण्याबाबत आदेश जारी करावेत अन्यथा शिक्षक सहकार संघटनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा