हवामान खात्याकडून महत्वाची माहिती; परतीचा पाऊस नऊ जिल्ह्यांना झोडपणार

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२२: मागील महिन्यापासून परतीच्या पावसाची चाहूल लागली आहे. तर मागील आठवड्यात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून महत्वाची माहिती समोर आली आहे‌, की सध्या परतीचा पाऊस वायव्य भारतासह, गुजरात आणि अरबी समुद्राच्या काही भागासह मध्य भारताच्या काही भागांतून मान्सून परतल्याचे सांगण्यात आले आहे.

वीस सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरु केला होता. पण आठवडा उलटून देखील परतीचा पाऊस मंद गतीने जात असल्याचे दिसून येत आहे. ऐकोनतीस सप्टेंबरला परत परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती.

पंजाब, चंदीगड, राजधानी दिल्लीसह जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तरप्रदेश, हरियाना आणि राजस्थानच्या आणखी काही भागांतून परतला होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे आणि कोल्हापुर व नाशिक आणि नगर जिल्ह्यात आज मुसळदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादुष्टीने सदर जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा