आज मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक; नाशिक कुंभमेळ्याचे नियोजन

7

नाशिक, ७ ऑक्टोबर २०२२: मागील आठवड्यात नाशिक शहराचे पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेत बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला होता. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत बैठक बोलावली आहे. असे दादा भुसे यांनी सांगितले आहे.

पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर लगेचच भुसे यांनी नाशिक महापालिकेतील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यातील २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा, नोकर भरती, क्लस्टर डेव्हलपमेंट, वाढ झालेली घरपट्टी कमी करणे या महत्वाच्या विषयांचा समावेश आहे‌. मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत विविध विषयांवरती निर्णय होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महत्वाची कामे, साठ मीटरचा बाह्य रिंग रोड आणि मनपातील रिक्तपदे भरणे अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला लागणाऱ्या मनुष्यबळाचा विचार करताना मनपाकडे ते नाही आहे. याचा विचार करताना नाशिक महापालिका निवडणूकी नंतर नोकर भरतीचा विचार सरकार करेल अशी माहीती समोर आली आहे‌. यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी नुकतीच मनपा मुख्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा