लाहोर, ४ जुलै २०२३ : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तोशाखाना खटल्यात न्यायालयाने खान यांचा जामीन अर्ज मंजूर केला. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जस्टिस अमीर फारुक यांनी हा निकाल दिला. पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे प्रमुख इम्रान खान यांच्या जामीन अर्जावर आज इस्लामाबादमध्ये सुनावणी झाली.
सुनावणीपूर्वी इम्रान खान यांनी मुख्य न्यायाधीश जस्टिस अमीर फारुक यांना बाजूला काढण्याची मागणी केली होती. सोमवारी संध्याकाळी उच्च न्यायालय बंद होण्याच्या काही मिनिटांपूर्वी खान यांच्या वकिलांनी एक याचिका दाखल केली. त्यात म्हटले होते – आम्हाला वाटते की सरन्यायाधीशांनी तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीपासून स्वत:ला वेगळे करावे, कारण त्यांच्या स्थगितीदरम्यान या प्रकरणाची निष्पक्ष सुनावणी होऊ शकत नाही.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे महागड्या ग्राफ मनगटी घड्याळासह भेटवस्तू खरेदी-विक्री करण्यासाठी गोत्यात आले आहेत, त्यांना तोशाखाना नावाच्या राज्य डिपॉझिटरीकडून सवलतीच्या दरात ह्या भेटवस्तू भेट म्हणून मिळाल्या होत्या आणि नफ्यासाठी त्यांनी त्यांची विक्री केली होती. हाच आरोप करत, निवडणूक आयोगासमोर सत्ताधारी पाकिस्तानी डेमोक्रेटिक पार्टीने तोशाखाना भेट प्रकरण मांडले. इम्रान खानने आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचे सांगण्यात आले. इम्रानने निवडणूक आयोगाला सांगितले होते की, या सर्व भेटवस्तू तोशाखान्यातून २.१५ कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्याची विक्री केल्यावर ५.८ कोटी रुपये मिळाले. तपासा नंतर ही रक्कम २० कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी प्रकाशित झालेल्या पाकिस्तानी वृत्तात असे म्हटले आहे की, इम्रान खान यांनी सरन्यायाधीशांना बाजूला काढण्याची केलेली मागणी याचे कारण म्हणजे न्यायमूर्ती अमीर हे अत्यंत प्रामाणिक आणि कठोर न्यायाधीश आहेत आणि त्यांनी पहिल्या दोन प्रकरणांमध्ये इम्रान खानचा जामीन फेटाळला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे