गोल पोस्ट राष्ट्रीय रागाच्या भरात बायकोने नवरा झोपेत असतानाच ओतले उकळते तेल…..

रागाच्या भरात बायकोने नवरा झोपेत असतानाच ओतले उकळते तेल…..

भोपाळ, ७ जानेवारी २०२१: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात घडलेल्या हिंसाचाराच्या एका भीषण घटनेत एका ३५ वर्षीय महिलेने आपल्या ३८ वर्षीय पतीच्या चेहर्यावर गरम तेल ओतल्यामुळे गंभीर जखम झाल्याचे आरोप केले गेले आहेत. कामावरुन नवरा उशीरा घरी का येतो म्हणून दोघांमधे वाद झाला आणि नंतर नवऱ्याच्या चेहर्यावर बायकोने उकळते तेल फेकले.

काय घडले….

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमारी अहिरवार असे आरोपी महिलेचे नाव असून, तिचा पती अरविंद अहिरवार हा रोजंदारीचा मजूर होता आणि तो वारंवार कामावरून उशिरा घरी येत होता. अशा वादावरून रात्री दोघांमध्ये भांडण झाले, परंतु त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत केली. मात्र, पहाटे पाचच्या सुमारास शिवकुमारी चा राग शांत झाला नाही आणि ती रागाने धुमसत होती, नंतर तिने झोपेत असताना अरविंदच्या चेहर्यावर गरम तेल ओतले. हा आवाज ऐकून कुटुंबीयांनी जोडप्याच्या खोलीत धाव घेतली आणि अरविंदला उपचारासाठी रुग्णालयात नेले.

यानंतर पोलिसांना कळविण्यात आले आणि शिवकुमारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. “कामावरून उशिरा परत आल्याबद्दल त्यांचा वाद झाला. सकाळी संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तिने हिंसक पाऊल उचलले, असे ” टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका पोलिस अधिकार्यांच्या हवाल्याने ते म्हणाले.

पत्नीने दिलगिरी व्यक्त केली…

पत्नीने त्यांच्या चेहेऱ्यावर तेल ओतल्यामुळे अरविंद वर बुंदेलखंड मेडिकल कॉलेज, सागर येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, पीडित व्यक्तीच्या भावाने सांगितले की, शिवकुमारीने तिच्या हिंसक कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version