मुंबई, २९ जानेवारी २०२१: प्रेम हे निसर्गाने दिलेली मानवाला एक सुंदर देणगी आहे. मात्र काळ बदलत गेला आणि मानवाने याच मानवतेला काळीमा फासणारी प्रेमाची व्याख्या करून घेतली. ज्यामुळे मानवजातीचे प्रेम हे आज घडीला सर्वात क्रूर आणि विकृतीचा चेहरा बनला आहे. तर याच विकृती मुळे अनेक वाईट घटना आज समाजात घडताना दिसत आहेत.
अशीच घटना नवी मुंबईतील महापे शिळफाटा रस्त्यावर घडली आहे. अमीरूल हसन या तरूणाचा मंगळवारी मृतदेह आढळला होता. या प्रकरणात रबाळे MIDC च्या पोलिसांनी चोख कामगिरी करत अवघ्या चोवीस तासांत या घटनेच्या गुन्हेगाराचा छडा लावला आणि त्याला अटक करण्यात आली.
मृतदेहाची ओळख पटताच, तांत्रिक तपासाच्या आधारावर हा खून त्याच्या मित्राने जुबेर खानने केल्याचे समोर आले. दोघे एकाच गावातील रहवासी असून अमीरूलने जुबेरच्या गर्लफ्रेंड बरोबर प्रेम संबध जोडल्याचा रागातुन हा खून केल्याचा धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
रबाळे MIDC च्या पोलिस पथकाने या घटनेच्या २४ तासात छडा लावल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.तसेच घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव