ठाणे, ६ ऑक्टोबर २०२३ : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मासुंदा तलावाजवळ महाराष्ट्र शासनाच्या चारचाकी वाहनामध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नौपाडा पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. या प्रकरणी अधिक तपास केला असता, मृत व्यक्तींचे नाव नागेश जाधव वय ३८ असून, तो महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेमध्ये वाहन चालक आहे.
मासुंदा तलाव येथे आहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ एका चारचाकी वाहनामध्ये हा मृतदेह होता. जिल्हा परिषदेमधील आपल्या अधिकाऱ्याला जाधव यांनी दुपारी कार्यालयात सोडले. त्या नंतर तो घटनास्थळी गेला. सदरचा वाहन चालक हा दारुच्या नशेत होता. अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. तर त्यांच्या गाडीच्या सीटखाली देखील मदयाची बाटली आढळून आली आहे.
सदरच्या वाहन चालकांने दारुचे अतिसेवन केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास नौपाडा पोलीस करत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर