पुणे, ६ जुलै २०२१: गौतम अदानींच्या कंपन्याच नव्हे तर इतर कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आलीय. ज्यामध्ये पतंजली प्रमुख आणि योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी रुचि सोया कंपनीचंही नाव आहे. एका महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान केलंय. या नुकसानीमुळं लाखो गुंतवणूकदार बुडाले आहेत. आकडेवारीबद्दल बोलल्यास, १००० शेअर्सचे सुमारे १.५ लाख रुपयांचं नुकसान झालंय. आश्चर्य म्हणजे गेल्या एका महिन्यात कंपनीकडून मोठ्या घोषणा केल्या गेल्या. त्यानंतरही गुंतवणूकदारांचं शेअर बाजारा मध्ये मोठं नुकसान झालंय.
विशेष म्हणजे यावर्षी कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आलीय. चालू वर्षात शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांमध्ये ६५ टक्क्यांची वाढ दिसून आलीय. १००० रुपयांच्या गुंतवणूकीमुळं ६५० रुपये नफा झाला आहे. याबरोबरच हे देखील जाणून घेऊया की, रुचि सोयामुळं बाजारातील गुंतवणूकदारांचं किती नुकसान झालंय.
गेल्या आठवड्यात किती नुकसान झालं
जर आपण मागील एका आठवड्याबद्दल बोललो तर शेअर बाजारामध्ये ७ टक्क्यांहून अधिक तोटा झाला आहे. आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यात रुचि सोयाच्या प्रति शेअर्समध्ये ८४ रुपयांचं नुकसान झालंय. म्हणजेच, ज्याच्याकडं रुचि सोयाचे १० हजार शेअर्स आहेत, त्यांना आठवड्यात ८४ हजार रुपयांचं नुकसान सहन करावा लागलं आहे. गेल्या आठवड्यात कंपनीच्या शेअर्सची किंमत १२०० रुपयांपेक्षा जास्त होती.
एका महिन्यात दिसली अधिक घट :
जर आपण मागील एका महिन्याबद्दल बोललो तर गुंतवणूकदारांचं १२ टक्के नुकसान झालंय. जर आपण रुपयांच्या बाबतीत पाहिलं तर एका शेअर्स मागं १५० रुपये कमी केले आहेत. त्याच्या कडं रुची सोयाचे १० हजार शेअर्स आहेत. एका महिन्यात त्याच्या मूल्यात १५ लाख रुपयांची घट झालीय. जे एक मोठं नुकसान आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे