ॲक्शन मोड मध्ये ‘आप’ सरकार, खासगी रूग्णालयात ८०% आयसीयू बेड आरक्षित

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर २०२०: दिल्लीत कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये केजरीवाल सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. दिल्ली सरकारनं राज्यातील ४२ खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयाच्या क्षमतेनुसार ८० टक्के आयसीयू बेड आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत.

यासह, ९० खासगी रुग्णालयांना कोरोना रूग्णांच्या क्षमतेनुसार ६० टक्के बेड आरक्षित करण्यास सांगण्यात आलं आहे. केजरीवाल सरकारच्या या निर्णयामुळं राज्यातील कोरोना संक्रमणाच्या उपचारासाठी आयसीयू बेडची क्षमता वाढून २६० होईल तसंच सामान्य बेडची संख्याही २६४४ पर्यंत वाढंल.

शासकीय आदेशानुसार, जर या रुग्णालयांच्या आयसीयू प्रभागात २०% पेक्षा जास्त बिगर कोविड रूग्णांची नोंद असेल तर त्यांचे उपचार होईपर्यंत त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं पाहिजे आणि आयसीयू रिक्त होताच ते कोरोना रूग्णासाठी राखीव ठेवावे. यापूर्वी दिल्ली सरकारनं ३३ खासगी रुग्णालयांना त्यांच्या क्षमतेच्या ८०% आयसीयू बेड्सना कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते.

यापूर्वी गुरुवारी दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल आणि राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राज निवास येथे बैठक झाली. यावेळी दिल्लीत वाढत्या कोरोना प्रकरणांविषयी चर्चा झाली. यावेळी राज्यपालांनी दिल्लीत कोरोनाविरूद्ध संरक्षण देण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची व वेळोवेळी पावलं उचलण्याचं सांगितलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा