अहमदनगर जिल्ह्यात धावणार लालपरी

अहमदनगर, दि. २३ मे २०२०: तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हातंर्गत बससेवा सुरु करण्यात आली आहे. ३२ बसच्या १६६ फेर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे.

अकरा आगाराच्या माध्यमातून ४४ बसच्या २२७ फेर्‍यांचे नियोजन होते. मात्र, संगमनेर शहर हॉट स्पॉट असल्याने येथून अकरा बसच्या माध्यमातून होणार्‍या ५२ फेर्‍या रद्द करून, आता दहा आगारांतून ३२ बसच्या १६६ फेर्‍या होतील. त्यासाठी ६५ चालक व ६५ वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर शहरातील बससेवा सुरु होण्याची प्रतीक्षा नगरकरांना आहे.

एमआयडीसीतील कामगारांसाठी ही बससेवा लाभदायक आहे. जिल्हातंर्गत सोडण्यात येणार्‍या बसेस अशा-

तारकपूर | नगर-संगमनेर (१२ फेर्‍या ), नगर-वांबोरी (१२ फेर्‍या), तारकपूर-राशीन (४ फेर्‍या), नगर-पाथर्डी (८ फेर्‍या).
शेवगाव। शेवगाव-नगर (१८फेर्‍या), शेवगाव-संगमनेर (६ फेर्‍या).
जामखेड। जामखेड-नगर (४ फेर्‍या), जामखेड-कर्जत (४ फेर्‍या).
श्रीरामपूर। श्रीरामपूर -कोपरगाव (८ फेर्‍या), श्रीरामपूर -नगर (२४ फेर्‍या).
कोपरगाव। कोपरगाव-श्रीरामपूर (८ फेर्‍या), कोपरगाव-संगमनेर (४ फेर्‍या), कोपरगाव- नगर (१२ फेर्‍या ).
पारनेर। पारनेर-सुपा-नगर (६ फेर्‍या), पारनेर- जामगाव- नगर (६ फेर्‍या ).
संगमनेर। संगमनेर- नगर (१० फेर्‍या).
श्रीगोंदा। श्रीगोंदा-नगर (८ फेर्‍या ), श्रीगोंदा-कर्जत (६ फेर्‍या ). नेवासा। नेवासा-नगर (८फेर्‍या), नेवासा-शिर्डी. (८ फेर्‍या).
पाथर्डी।पाथर्डी- नगर(८ फेर्‍या ), पाथर्डी-शेवगाव (८ फेर्‍या).
अकोले।अकोले-राजुर (१९ फेर्‍या), अकोले-संगमनेर (१६ फेर्‍या )अकोले-मोग्रस- कोतूळ (६ फेर्‍या).

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा