गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपले

अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपले

अमरावती, दि.११ मे २०२०: एकीकडे कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच संपूर्ण जिल्ह्याला अवकाळी पावसाने व गारपिटीने झोडपल्यामुळे जिल्ह्यात खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

अवकाळी पावसासारख्या अस्मानी संकटावर मात करून पिकवलेल्या फळबागाचे हातातोंडाशी आलेल्या गव्हाच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने व गारपिटीमुळे आंब्याचा बहर व संत्राच्या बागांच्या अडचणीत खूप मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकंदरीत दर्यापूर ,अचलपूर, चांदूर बाजार अमरावती इतर सर्वच तालुक्‍यांना व शहरी भागांना अवकाळी पावसाने झोडपले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version