बारामती, २९ जुलै २०२० : यंदाच्या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत बारामती केंद्राचा ९८ टक्के निकाल जाहीर झाला. यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. बारामती केंद्रावर ५९५५ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते.यापैकी ५८५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारामती केंद्रावरील ७१ शाळांमधील ३१३९ मुले व २८१६ मुलींनी परीक्षा दिली होती. यापैकी ३०६८ मुले तर २७९२ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
सालाबादप्रमाणे यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. बारामती तालुक्यातील मिशन हायस्कूल, नवमहाराष्ट्र विद्यालय पणदरे, आर. एन. अग्रवाल टेक्निकल हायस्कूल, आनंद विद्यालय होळ, विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर, शिरसाई विद्यालय शिरसुफळ, विठ्ठल माध्यमिक विद्यालय भिकोबा नगर, न्यू इंग्लिश स्कूल खलाटे वस्ती, श्रीमती हौसाबाई, पांडुरंग घोरपडे विद्यालय पिंपळी, शारदाबाई पवार विद्या निकेतनशारदानगर, न्यू इंग्लिश स्कूल मेखळी, विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक विद्यालय, वसंतराव पवार विद्यालय देउळगाव रसाळ, श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर, सोमेश्वर विद्यालय आंबी बुद्रुक, न्यू इंग्लिश स्कूल गोजुबावी, खांडेश्वरी माध्यमिक विद्यालय खांडज, माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी, श्री बी. एस. काकडे देशमुख विद्यालय निंबूत, श्री भैरवनाथ विद्यालय को-हाळे खुर्द, उर्दू माध्यमिक विद्यालय बारामती, श्री भैरवनाथ विद्यालय मेडद, उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा वाघळवाडी, बाजीराव गावडे पाटील विद्यालय गुनवडी, विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल बारामती, कवी मोरोपंत शिक्षण संस्था माध्यमिक बारामती, विजय बाल विकास मंदीर माध्यमिक विद्यालय बांदलवाडी, विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास मंदीर,पिंपळी, श्री सिध्देश्वर पब्लिक स्कूल को-हाळे बुद्रुक, राजे प्रतिष्ठान न्यू इंग्लिश स्कूल खंडूखैरेवाडी, अभिनव इंटरनॅशनल स्कूल प्रगतीनगर, सोमेश्वर पब्लिक स्कूल, शारदानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, शारदाबाई पवार विद्या निकेतन डे स्कूल, संत सावतामाळी प्रायमरी स्कूल, सरस्वती माध्यमिक विद्यालय, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल तब्बल ३८ शाळांचा निकाल शंभर टक्के जाहिर झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव