बारामती शहरात सोमवार दि २३ जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसच्या या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भाव होऊ नये या धर्तीवर नागरिकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये म्हणून १४४ कायद्यानवे संचारबंदी लागु केली आहे.आज सकाळी शहरात येणारे मुख्य रस्ते पोलिसांनी ब्यारगेट व पोलीस गाड्या आडव्या लावून रस्ते वाहतुकीस बंद केले होते.शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या नागरिकांची चौकशी करून त्यांना सोडले जात होते.पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या १५ लोकांवर १८८ कायद्याप्रमाणे प्रमाणे खटला दाखल केला आहे.
शहरात आज कोरोना संसर्गाच्या धर्तीवर शहरात येणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली होती.कालच्या कडकडीत बंद नंतर आज सकाळ पासून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली होती.शासनाने १६ मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद पुकारला असताना देखील नागरिक रस्त्यावर दिसत होते.आज सकाळ पासून बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी १४४ कायद्यांनवे संचारबंदी मध्ये कसबा, भिगवण रोड,पाटस रोड ,इंदापुर रोड,येथे नाकाबंदी केली.फक्त आजारी पेशंट असेल तर त्याला अत्यावश्यक सेवा म्हणून सोडले जात होते.तर महत्वाच्या कामासाठी चार चाकी गाड्यांना शहराच्या बाहेरील रिंग रोडने जाण्यास पोलीस सांगत होते. शहरात अनेक ठिकाणी औषध खरेदी करण्यासाठी लोकांनी एक मीटर अंतर ठेऊन रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत होते.शहरातील अत्यावश्यक असणारे किराणा मालाची दुकाने व भाजी मंडई सुरू होती मात्र येथे देखील नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले मंडई परिसरात चहा व गुटखा विक्री करणार्यांवर देखील पोलिसानी कारवाई केली तर काही ठिकाणी शहरातील सुशिक्षित नागरिक व स्थानिक राजकीय पदाधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसले.आज पोलीस प्रशासनाने संचारबंदी विषयी सांगण्यासाठी शहरात रिक्षा, पोलीस गाडी तसेच खाजगी गाड्यांवरून स्पीकर वरून नागरिकांना संचारबंदी बाबत सूचना दिल्या तसेच चार पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये म्हणून पोलीस प्रशासन नागरिकांना आवाहन करत होते.संचारबंदी सुरू असताना देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १५ तरुणांवर कलम १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली असून त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात सध्या १४४ कलमान्वये संचारबंदी सूर असल्याने नागरिकांनी फक्त अत्यावश्यक सेवे साठी घरातून बाहेर पडावे विनाकारण रस्त्यावर फिरू नये.तसे आढल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या मेडिकल दुकानात देखील गर्दी होणार नाही याची दखल घ्यायची आहे.
बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील