बेळगावात सामाजिक अंतर पाळत काढली छ. शिवाजी महाराजांची मिरवणूक

बेळगाव,दि.३०एप्रिल २०२०: बेळगाव शहरातील युवकांनी लॉकडाऊनच्या काळात सामाजिक अंतर पाळत आगळा वेगळा उपक्रम राबविला आहे. सर्वात अगोदर या युवकांनी संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण मोहीम राबवली.त्यानंतर शिवजयंतीची मिरवणूक काढत मिरवणुकीची परंपराही राखली.

बेगळगावातील एका १०० मीटर अंतर असलेल्या गल्लीत ही मिरवणूक सामाजिक अंतर पाळत काढण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक देखावा देखील तयार केला होता.

सदैव जनतेचे हित जपणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यातच कोरोनामुळे सध्या सगळ्यांचे आरोग्य जपणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांची जनतेच्या प्रति असलेली भूमिका लक्षात घेत बेळगाव येथील कांगली गल्ली येथील युवक मंडळाने हा अभिनव उपक्रम राबवला होता.

या मंडळाने हिच आमूची प्रार्थना अन् हेच आमूचे मागणे या गीतेच्या पार्श्वभूमीवर चित्ररथ तयार करून मिरवणुकीद्वारे निर्जंतुकीकरण मोहीम राबवली. सोशल मीडियावर या मिरवणुकीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ही मिरवणूक लॉकडाऊनच्या काळात मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.

या मिरवणुकीसाठी बाळू तोपिनकट्टी, राजू हुबळीमर, लक्ष्मण काकतकर, सिद्धार्थ भातकांडे, युवराज हट्टीकर, प्रसाद हुबळीकर, आदित्य हुबळीकर, सुभाष सुर्यवंशी आणि नारायण किटवाडकर यांनी परिश्रम घेतले.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा