बिहारमध्ये ९ वाजेपर्यंत ५.७०% मतदान, नितीशकुमार-तेजस्वी यांनीही केलं मतदान

पाटणा, ३ नोव्हेंबर २०२०: बिहार विधानसभा निवडणुका २०२० च्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. दुसर्‍या टप्प्यात १७ जिल्ह्यातील ९४ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. बिहार निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात १४६३ उमेदवारांचं भवितव्य ठरविण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी सुशील मोदी, तेजस्वी यादव, राबड़ी देवी यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदान केलं.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्यात मतदान केलं. मत दिल्यानंतर नितीश यांनी विजयाचं चिन्ह दाखवून लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडं मतदानासाठी आरजेडी नेते तेजस्वी यादव मंगळवारी पाटण्यात दाखल झाले. या दरम्यान, राबड़ी देवीसुद्धा त्यांच्याबरोबर राहिल्या, इथं राबड़ी म्हणाल्या की, बिहारमध्ये बदलांची गंगा वाहात आहे, बिहारला परिवर्तनाची गरज आहे.

मतदान केल्यावर तेजस्वी यादव म्हणाले की, मतदानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे, मी बिहारच्या सर्व लोकांना आवाहन करतो की सर्व लोकांनी मतदान करावं. बिहारमध्ये ज्या बदलाची लाट ओसंडत आहे, ते शिक्षण, औषध, उत्पन्न, सिंचन, महागाई, सुनावणी आणि कृती असं एक सरकार निवडण्याची इच्छा आज बिहारच्या जनतेला आहे. आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे, प्रश्न विचारण्यात आले आहेत, अशी आशा आहे की पंतप्रधान मोदी त्यांच्या सभेत या बाबींवर स्पष्टीकरण देतील.

तेजस्वी यादव म्हणाले की, बिहार एक वाईट टप्प्यातून जात होता, पूर-कोरोना आणि मजुरांची स्थिती सर्वांना माहित आहे. लोकं सध्याच्या सरकारवर खूप चिडले आहेत.

पहिल्या एक तासातील आढावा

बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू आहे. पहिल्या एक तासामध्ये पाटणा जिल्ह्यात ४ टक्के मतदान नोंदलं गेलं. आठ पर्यंत पाटणा जिल्ह्यात किती मतदान …

बख्तियारपूर: – ७.२३
दिघा: – ३.४८
बांकीपूर: – ३.१७
कुम्हरर: – २.३७
पटना साहिब: – ३.२३
फतुहा: – ४.९०
दानापूर: – ४.४४
मनेर: – ५.५४
फुलवारी: – ५.५८

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा