गोपालगंज, दि. १६ जुलै २०२० : बिहार सध्या दोन समस्यांशी लढताना दिसत आहे. एक म्हणजे कोविड -१९ राज्यामध्ये दिवसेंदिवस पाय पसरत आहे तर दुसर्या बाजूला मान्सून सुरू झाल्यामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यातच आता नवीन भर पडली आहे ती म्हणजे प्रशासनाचे ढसाळ कामकाज. राज्यात सर्व काही अलबेल असल्याचा दावा करणारे नीतीश सरकार गोपालगंज येथील पुलाचा काही भाग ढासळल्यामुळे संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. १ महिन्यापूर्वी सत्तरघाट महासेतू या पुलाचे उद्घाटन झाले होते आणि आता या पुलाचा काही भाग ढासळल्यामुळे तब्बल २६४ कोटी पाण्यात गेल्यात जमा आहे.
१६ जून रोजी, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाटणा येथून पुलाचे उद्घाटन केले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार एक महिन्यापूर्वी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. पाण्याचा दाब वाढल्यामुळे हा फुल तुटला आहे. फुल तुटल्यामुळे लोकांचे दळणवळण थांबले आहे. येथून लालछापर, मुझफ्फरपूर, मोतीहारी, बेतिया येथील लोकांचा संपर्क बंद झाला आहे.
या पुलाने गोपाळगंजला चंपारण आणि तिरुतच्या अनेक जिल्ह्यांना जोडले आहे. बुधवारी गोपाळगंजमध्ये तीन लाख क्युसेकपेक्षा जास्त पाणी होते. गंडकच्या अशा उच्च स्तराच्या दबावामुळे या महासेतुचा अॅप्रोच रस्ता तुटला होता. हा पूल बैकुंठपूरच्या फैजुल्लापूरमध्ये तुटलेला आहे. भाजपचे आमदार मिथिलेश तिवारी यांनी बिहारच्या रस्ते बांधकाम विभागाचे मंत्री नंदकिशोर यादव यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे.
हा पूल बिहार पूल बांधकाम विभागाने बांधला होता. या पुलाचे बांधकाम २०१२ साली सुरू करण्यात आले होते. या महासेतुचे उद्घाटन १६ जून २०२० रोजी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर करण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी