केप टाऊनमध्ये भारत- पाकिस्तान आमने-सामने

मुंबई: केप टाऊनमध्ये ११ मार्चपासून सुरू होणाऱ्या ओव्हर ५० एस क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात मुकाबला होणार आहे. १३ मार्च रोजी दोन्ही संघ आमने सामने भिडणार आहेत.
या स्पर्धेत सर्व देशांचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सहभागी होतात. आतापर्यंत या स्पर्धेत आठ देश सहभागी होते. मात्र आता भारत, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे, नामिबिया आणि वेस्ट इंडीज या स्पर्धेत पदार्पण करत आहेत.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेल्स, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत यापूर्वीच सहभागी झाले आहेत.

भारताचा संघ : शैलेंद्र सिंग (कर्णधार), इक्बाल खान, मयंक खंडवाला, पारक अनंत, तुषार झावेरी, अश्विनी अरोरा, प्रीतिन्दर सिंग, आदिल चागला, पीजी सुंदर, प्रदीप पटेल, वेरिंदर भोमबला, थॉमस जॉर्ज, संजीव बेरी, दीपक, दिलीप चव्हाण आणि श्रीकांत सत्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा