पुणे, २० जानेवारी २०२१: सध्याच्या जीवन शैलीमधे बरेच बदल होत असल्याने आरोग्यची काळजी घेणं गरजेचं आहे. तर आहारात आपण काय सेवन करतो? त्याने आपल्याला काय फायदा मिळतो? शरीराला ते किती उपयुक्त आहे?याची माहिती आपल्याला असणे ही महत्त्वाचे आहे आणि आज अपण आश्याच एका पदार्थाबद्दल त्याची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत.
“गुळ” मित्रांनो नाव नक्कीच ऐकलं असेल ऐकलंच काय तर थोडा गुळ चाखला ही नक्कीच आसणार. पण, तुम्हाला माहीत आहेत का गुळाचे काय काय फायदे आहेत आणि खास करून थंडीत तर आरोग्याला “गुळ” फार फायदेशीर ठरतो, ते कसे तर त्या बद्दल आपण वाचूयात.
गुळाचे फायदे…..
रोज १०० ग्रॅम गुळाचे सेवन केल्याने प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते.
बद्धकोष्ट, ॲसिडीटी आणि पित्तासारख्या आजारावर गुळ गुणकारी आहे.
रोज थोडे गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.
सर्दी झाल्यावर गुळ आणि आलं खा.
गुळ हडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. याच्या सेवनाने सांधेदुखीची समस्या दूर होते. तर तसेच आपल्यासोबत गुळाचे सेवन केल्याने हाडं देखील मजबूत राहतात.
या आधी तुम्हाला गुळाचे हे फायदे माहिती होते का? हे आम्हाला नक्की कळवा.आणि हो थंडी मधे गुळ खा आणि निरोगी रहा.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव