भारतात कंडोमच्या विक्रीत तब्बल लक्षणीय वाढ

मुंबई : सर्वजण लॉकडाऊन झाल्यापासून कंडोमच्या विक्रीत लक्षणीय वाढझाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तब्बल ५० टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रमुख मोठ्या शहरांमध्ये कडक बंद पाळण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
या आदेशाचा अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. असे असतानाचा मेडिकल क्षेत्रातून हा खळबळजनक रिपोर्ट समोर आला आहे.
लॉकडाऊन असल्यामुळे अनेक जण हे घरी आहेत. त्यामुळे प्रत्येकजण जीवनावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवत आहे.
अन्नधान्य, औषध, भाजीपाला आदि गोष्टींचा नागरिक साठा करून ठेवत आहेत. त्यात आता नागरिकांनी कंडोमच्या खरेदीलाही पसंती दिली आहे. अनेक मेडिकल स्टोअर्सच्या मालकांनी याबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोमची विक्री झाली नव्हती. मात्र आता दिवसाला कंडोमच्या विक्रीत ५० टक्के वाढ झाली असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा