दिल्लीमध्ये मोठ्या भूकंपाची आशंका, जमिनीखाली होत आहेत बदल

नवी दिल्ली, दि. ५ जून २०२०: देशाची राजधानी आणि आसपासच्या भागाला कधीही मोठा भूकंप बसू शकतो. अशी शंका देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यामागील कारण असे आहे की दिल्ली-एनसीआर मध्ये गेल्या एका महिन्यापासून सतत लहान स्तरावरील अनेक भूकंप झाले आहेत. देशातील सर्वोच्च देखरेख संस्था नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीने वृत्त दिलं आहे की दिल्ली-एनसीआरमध्ये १२ एप्रिल ते २९ मे दरम्यान भूकंपाचे १० झटके जाणवले.

नुकतेच नोएडामध्ये रात्री ३.२ च्या तीव्रतेचे भूकंप जाणवले. गेल्या पाच दिवसांत तीन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीच्या जमिनीखाली नक्की काय होत आहे? किंवा इतर ठिकाणी झालेल्या भूकंपाचे धक्के दिल्लीमध्ये जाणवत आहेत का? असे प्रश्न आता दिल्लीकरांच्या मनामध्ये निर्माण झाले आहे. दिल्लीमध्ये आता सोशल मिडीयावर इमर्जन्सी कीट किंवा बॅग ठेवण्यासाठी च्या सूचनांचे मेसेज दिसण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावरील या मेसेज मध्ये भूकंपापासून कसे वाचावे, स्वतःचे संरक्षण कसे करावे या बाबत चर्चा होताना दिसत आहेत.

जवाहरलाल नेहरू सेंटर ऑफ एडवांस्ड साइंटिफिक रिसर्च मधील प्रोफेसर सीपी राजेंद्रन यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, दिल्ली मध्ये येत्या काळात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. परंतु हा भूकंप केव्हा येईल किंवा हा किती ताकदीचा असेल याविषयी आता सांगणे कठीण आहे. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत राजेंद्रन यांनी या गोष्टी बोलल्या.

सीपी राजेंद्रन यांनी २०१८ मध्ये एक संशोधन केले होते. त्यानुसार १३१५ ते १४४० या कालावधीत भटपूर ते नेपाळमधील मोहना खोला पर्यंत ६०० किमी लांबीचे सीसमिक गॅप तयार झाले होते. म्हणजेच, जमिनीच्या आत एक मोठी दरी तयार झाली आहे. याचा अर्थ हा एका सक्रिय भूकंपाचा परिणाम आहे.

सीपी राजेंद्रन म्हणाले की या गॅप दरम्यान कोणतीही हालचाल निदर्शनास आलेली नाही परंतु छोट्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ही गॅप गेल्या ६००-७०० वर्षांपासून शांत आहे. परंतु त्यावर सतत भूकंपाचा दबाव असतो. हा दबाव भूकंपाच्या रूपाने आला असावा. येथे भविष्यात भूकंप झाल्यास त्याची तीव्रता ८.५ परिमाणापर्यंत जाऊ शकते.

दिल्ली-एनसीआर भागात ८.५ तीव्रतेचा भूकंप झाल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. दिल्ली-एनसीआरच्या खाली १०० पेक्षा जास्त लांब आणि खोल फॉल्ट्स आहेत. त्यातील काही दिल्ली-हरिद्वार रिज, दिल्ली-सरगोधा रिज आणि ग्रेट बाऊंड्री फॉल्टवर आहे. या व्यतिरिक्त, बरेच सक्रिय फॉल्ट्स त्यांच्याशी संबंधित आहेत. हे सर्व फॉल्ट हिमालयातील टेक्टोनिक प्लेटला लागूनच आहेत, हिमालयातील टेक्टोनिक प्लेटमधील बदलांमुळे दिल्लीच्या आसपासचे फॉल्ट हादरले किंवा कंपित झाले आहेत ज्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्ये हादरे जाणवतात.

हिमालयीय टेक्टोनिक प्लेटमधील क्रिया पृथ्वीच्या आत दबाव निर्माण करत आहे. हा दाब सुटला की भूकंप होतो. ते सौम्य किंवा धोकादायक देखील असू शकतात. २९ मे रोजी रोहतक येथे ४.६ तीव्रतेच्या भूकंप आला होता. दिल्ली आणि आसपासच्या भागात असे भूकंप यापूर्वीही घडले आहेत. १९६० मध्ये दिल्लीत ४.८ तीव्रतेचा भूकंप झाला. दिल्लीतील ७५ टक्के इमारती हादरल्या होत्या. उत्तर कॅन्टपासून गुरुग्रामपर्यंत मैदानात तडे होते. लाल किल्ला आणि राष्ट्रपती भवन यांचेही नुकसान झाले. या भुकंपा दरम्यान १०० हून अधिक लोक जखमी झाली होती.

दिल्लीच्या आसपास असणाऱ्या फॉल्ट्स मुळे ६.५ पर्यंत भूकंप येऊ शकतो. सीपी राजेंद्रन यांनी सांगितले की सेंट्रल हिमालयीन फुटहिल्समध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण शेकडो वर्षांपासून या भागात मोठा भूकंप झाला नाही. हे खूप शांत आहे. तीच गोष्ट धोकादायक आहे. राजेंद्रन म्हणाले की भारतीय प्लेट सतत उत्तर दिशेने सरकत आहे. यामुळे हिमालयात दबाव आहे. ज्या दिवशी हा दाब सोडला जाईल त्या दिवशी भयानक भूकंप किंवा भूकंपांची मालिका येऊ शकते. पण हे कधी होणार हे सांगणे फार कठीण आहे.

राजेंद्रन यांनी सांगितले की यमुना नदीची माती अशी आहे की त्यावर भूकंप होण्याचा धोका जास्त असतो. यामुळे इमारतींचे नुकसान होऊ शकते. हिमालयातून भूकंपाचे धक्के आल्यास गंगा नदीचा मैदानी भाग व यमुना नदीचा मैदानी भाग मोठ्या प्रमाणावर प्रभावित होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा