हवेत उडणाऱ्या बाईक विषयी सविस्तर

जपान, १९ सप्टेंबर २०२२: तंत्रज्ञान आणि विज्ञान इतके पुढे गेले आहे की, आपण जे काही कल्पना करून त्या त्या गोष्टीत आता घडत आहेत. आतापर्यंत आपण हवेत उडणारी किंवा पाण्यावर चालणारी गाडी यावी अशी अपेक्षा करत होतो. आता हवेत उडणारी बाईक खरंच अस्तित्वात आली आहे.

‘एरविन्स एक्सटुरिस्मो’ अमेरिकेतील डेट्रॉईट ऑटो शोमध्ये हवेत उडणाऱ्या बाईकची झलक पाहायला मिळाली आहे. जपानची स्टार्टअप कंपनी एअरविनस टेक्नॉलॉजीने ही हॉवरबाईक बनवली आहे. तासी १०० किलोमीटर असा प्रवास करणारी ही बाईक पेट्रोलवर चालते, खरंतर उडतेच म्हणावं लागेल.

या बाईकला सध्या वेगमर्यादा असली तरी देखील तब्बल १०० किलो पर्यंत वजन ही बाईक पेलू शकते आणि ३० मिनिटे ते ४५ मिनिटे सलग हवेत उडू देखील शकते. या गाडीचे वजन ३०० किलो असून सध्या त्याची किंमत मात्र आफाट आहे.

या बाईकची किंमत ७,७७,००० डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत सुमारे ६ कोटी २० लाख ३२ हजार १८३ रुपये इतकी होते. २०२५ पर्यंत ही बाईक भारत, चीन, आणि इतर देशात विक्रीस उपलब्ध होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा