दिवेघाटात विठाई आली भक्तांच्या भेटीला, उभारली तब्बल ६० फूट उंच मूर्ती

पुणे, दि. १७ जून २०२०: वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या सुरू असलेला वारीचा हा वारसा कोरोनाव्हायरस च्या संकटामुळे पहिल्यांदाच खंडित झाला आहे. प्रथेप्रमाणे जर वारी निघाली असती तर आज लाखो वारकऱ्यांनी अवघड दिवे घाट पार केला असता. वारकऱ्यांच्या कडून देखील पालखी सोहळा कमी गर्दी करता का होईना पण सुरु राहिला पाहिजे अशी सरकारकडे मागणी केली गेली होती. परंतु कोरोनाव्हायरस संकट पाहता सरकारने संमती देणे टाळले.

यावर्षी वारकरी विठुरायाला भेटण्यासाठी पंढरपूरला जाऊ शकले नसले तरी आता पंढरपूरची ही माऊली च आपल्या लेकरांच्या भेटीसाठी दिवे घाटामध्ये येऊन उभी ठाकली आहे. होय साक्षात माऊली दिवे घाटामध्ये कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची वाट पाहत आहे. दिवे घाटामध्ये तब्बल ६० फूट उंचीची विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली आहे. त्यामुळे वारकरी पंढरपूरला जाऊ शकले नसले तरी विठ्ठल मात्र त्यांना भेटण्यास आला आहे.

या मूर्तीचा पाया १५ फुटाचा आहे तर मूर्तीची उंची ४५ फूट आहे. अशी एकूण ६० फूट उंचीची ही मूर्ती पुणे येथील दिवे घाटामध्ये उभारण्यात आली आहे. ही मूर्ती तयार करताना सिमेंट व विशेष धातूंचा वापर करण्यात आला आहे. तसेच विठ्ठलाच्या माथ्यावर असलेल्या टिळाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा