डोंबिवलीत ९१ वर्षीय आजींची कोरोनावर मात

4

डोंबिवली, दि. १२ जुलै २०२०: डोंबिवली पूर्वेकडील छेडा रोडला राहणाऱ्या सुशिला विश्वनाथ जोशी या ९१ वर्षीय आजींनी कोरोनावर मात केली आहे. २८ जून रोजी त्यांची कोरोना टेस्ट झाली. ३० तारखेला त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. बरीच धावपळ करून शेवटी एका खासगी हॉस्पिटलमध्ये या आजींना बेड मिळाला.

१० दिवसांनी दुसरी टेस्ट झाली आणि त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी या आजी घरी परतल्या तेव्हा त्यांचे स्वागत करण्यात आले. बहुदा डोंबिवलीतील ९१ वर्षाची पहिली रुग्ण कोरोनावर मात करणारी असावी. चार दिवसांपूर्वी कल्याणमध्ये सुद्धा १०४ वर्षाच्या आजोबांनी कोरोना वर मात करून ते घरी परतले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा