गुजरातमध्ये मुंबई पोलिसांनी केला ड्रग्स कारखान्याचा पर्दाफाश, १००० कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्स जप्त

मुंबई, १७ ऑगस्ट २०२२: मुंबई पोलिसांनी गुजरातमधील ड्रग्जच्या कारखान्याचा पर्दाफाश केला. अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितलं की १० दिवसांत आणखी एक मोठं यश मिळालं आहे. मुंबई पोलिसांनी दक्षिण गुजरातच्या अंकलेश्वरमध्ये एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. १,०२६ कोटी रुपयांचा मेफेड्रोन (अमली पदार्थ) जप्त करण्यात आला आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केलीय.

मुंबई पोलिसांनी यापूर्वी २९ मार्च रोजी मुंबईतील गोवंडी उपनगर, ठाण्यातील अंबरनाथ आणि पालघरमधील नालासोपारा, गुजरातमधील अंकलेश्वरसह अनेक ठिकाणी छापे टाकून तपास सुरू केला होता. मुंबई पोलिसांनी जप्त केलेल्या ड्रग्जचा आकडा २,४३५ कोटींवर पोहोचलाय.

या प्रकरणाची अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, १३ ऑगस्ट रोजी केलेल्या कारवाईत वरळी युनिटच्या अँटी नार्कोटिक्स सेलने 513 किलो मेफेड्रोन (अमली पदार्थ) आणि ८१२ किलो पांढरी पावडर आणि ३०७ किलो रसायनं जप्त केली आहेत. याचा वापर अंमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, अंकलेश्वरमधील पानोली येथील जीआयडीसी परिसरात असलेल्या कारखान्यात छापा टाकण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा