हिंगणघाटमध्ये तीन रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

वर्धा, २६ मे २०२३ : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट रेल्वे स्थानकातील थांबा कोरोना काळापासून बंद करण्यात आला होता. हा थांबा रेल्वे गाड्यांसाठी पूर्ववत सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता हिंगणघाट शहरांमध्ये पुन्हा तीन रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.

हिंगणघाट रेल्वे स्थानकावर कोरोना कालावधी आगोदर अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे होते. परंतु कोरोनाच्या महामारीने देशभरातील सर्वच थांबे बंद करण्यात आले होते. कोरोनाचा काळ संपल्यावर सर्व ठिकाणचे थांबे पूर्ववत सुरू झाले. मात्र हिंगणघाट रेल्वे स्थानकाचा थांबा पूर्ववत करण्यात आला नव्हता. हिंगणघाट रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचे थांबे द्यावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले होते.

हिंगणघाट स्थानकात रेल्वेचे थांबे न दिल्यास रेल्वे पटरीवर उतरून रेल्वे आडवण्याच्या आंदोलनाचा इशारा दिला होता. याची रेल्वे प्रशासनाने दखल घेत हिंगणघाट स्थानकात चेन्नई-कंत्रा एक्सप्रेस, चेन्नई-जयपूर एक्सप्रेस, गोरखपूर एक्सप्रेसला तात्काळ थांबे दिले आहेत. त्यामुळे हिंगणघाटकरांची रेल्वे थांब्याची मागणी पूर्ण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा