गोल पोस्ट गुन्हा हैदराबादमध्ये २५ वर्षीय महिलेने १४३ जणांवर केला बलात्काराचा खळबळजनक आरोप 

हैदराबादमध्ये २५ वर्षीय महिलेने १४३ जणांवर केला बलात्काराचा खळबळजनक आरोप 

हैदराबाद २२ ऑगस्ट २०२०: तेलंगानाची राजधानी हैदराबादमध्ये एका २५ वर्षीय महिलेने १४३ लोकांनी अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या घटनांत १४३ लोकांनी अनेकदा बलात्कार,अतिप्रसंग केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ४२ पानांचा FIR नोंदविला आहे.

हैदराबादच्या पुंजागुट्टा पोलिसांनी ४२ पानाची एफआयआर नोंदविली आहे. या पानांमध्ये या १४३ लोकांची माहिती आहे.पीडितेने ज्या लोकांवर आरोप केले आहेत त्यामध्ये तिच्या ओळखीचे, राजकारणी, विद्यार्थी नेता, पत्रकार, फिल्म आणि अन्य क्षेत्रातील व्यक्ती आहेत. लग्नानंतर या महिलेवर पतीने आणि तिच्या सासरच्यांनी लैंगिक अत्याचार केले व मारहाणही केली. यानंतर तिने तलाक घेतला. तलाक घेतल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. महिलेनुसार गेल्या काही वर्षांपासून ती लैंगिक अत्याचारा बळी पडली आहे. मात्र, पहिल्यांदाच पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. महिलेने काही आरोपींवर ठार मारण्याची धमकी देणे आणि ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविण्याचाही आरोप केला आहे.

पोलीस या सर्व आरोपींची चौकशी करणार आहे. यामध्ये काही महिलाही सहभागी आहेत. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version