इंदापूर, दि.८ मे २०२०: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील दारुची दुकाने पोलीस बंदोबस्तात उघडली होती. त्यामुळे इंदापुरात सकाळपासूनच मद्यप्रेमींनी वाईन शॉप बाहेर गर्दी केली. काही जण तर तीन चार तासांपासून रांगेत तात्कळत उभे होते.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या काळातही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारू विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. यानंतर ठिकठिकाणच्या अनेक मद्य प्रेमींना वाईन शॉपसमोर गर्दी केली.
इंदापूर शहरात सकाळपासूनच काही मद्यप्रेमी वाईन शॉपसमोर जमा झाले होते. अनेक दिवसांनंतर दारु मिळणार असल्याने तळीरामानी गर्दी केली होती.
तोंडाला मास्क, हातात पिशव्या आणि पैसे घेऊन अनेकजण भर उन्हात उभे होते. अनेक दिवसानंतर दारु मिळणार असल्याने त्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता. रेशन धान्य दुकानासमोर ज्याप्रमाणे कूपन घेण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्या होत्या, तशीच रांग दारुसाठी लागली होती. अखेर वाईन शॉप समोरील वाढलेली गर्दी हटवण्यासाठी पोलीस वाईन शॉप समोर दाखल झाले होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे