गोल पोस्ट राजकारण जळगाव जिल्ह्यातील चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा गट) तालुकाध्यक्षपदी विजय पाटील, तर...

जळगाव जिल्ह्यातील चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा गट) तालुकाध्यक्षपदी विजय पाटील, तर शहराध्यक्ष पदी गिरीश देशमुख यांची निवड

चोपडा, जळगाव ४ डिसेंबर २०२३ : जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील वरडी गावाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजितदादा गट) तालुकाध्यक्ष पदी तर शहराध्यक्ष पदी गिरीश देशमुख यांची निवड करण्यात आली. नियुक्ती पत्र जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, संजय पवार ,सुनिल पाटील यांनी दिले.

सध्या महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यामुळे अजितदादा गट पुर्णपणे सक्रिय झाला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी पक्षाकडून तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष नेमणूक केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुकाध्यक्ष पदी वरडी गावाचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील व चोपडा शहराध्यक्ष पदी गिरीश देशमुख यांचे नियुक्तीचे नुकतेच प्राप्त झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी सुनिल पाटील, घनश्याम अग्रवाल, नारायण पाटील, अमृतराज सचदेव, प्रविण गुजराथी, मिलिंद सोनवणे, रमाकांत बोरसे, शुभम सोनवणे यांचे सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : आत्माराम पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version