पुणे, ३ जून २०२३ : जेजुरी येथे सुरू असलेल्या चक्री उपोषण आंदोलनाचा आठवा दिवस असून, धर्मदाय आयुक्तांच्या विश्वस्त निवडी बाबत झालेल्या अन्यया विरोधात ग्रामस्थांनी जेजुरी येथे कुलधर्म कुलचारातील जागरण गोंधळाचे प्रतीक असलेल्या दिवटी, बुधल्या पेटवून बाहेरगावच्या निवडलेल्या ट्रस्टिंचा निषेध करीत, जाहिर घोषणा देत मयुरेशवर मंडळ कार्यकर्त्यांसह राजवाडा चौक ते नंदिचोक ते भक्तीनिवास पर्यंतपायी पद यात्रा काढली.
या आंदोलनात,आंदोलन कर्त्यांनसह समस्त ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. यावेळी जेजुरी ग्रामस्थ, नगरसेवक सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख, मानकरी अध्यक्ष जालिंदर खोमणे, माजी देवस्थान विश्वस्त संदीप जगताप, मानकरी शैलेश राऊत, अतुल सावन्त, संदीप कुतंवळ, अभिजित भंडारी, मनोज बारसुडे, मल्हार कुदळे, नाना घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते सचिन खोमणे, उमेश जगताप आदी मान्यवर उपस्तिथ होते.
जेजुरीचे खंडोबा देवस्थान, हे महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. येथील विश्वस्तांची मुदत संपल्यानंतर, पुणे धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून नवीन विश्वस्त मंडळाची निवड करण्यात आली आहे. परंतु विश्वस्त निवड करताना सामाजिक कार्य करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून, पुणे जिल्ह्यातील बाहेरील विश्वस्तांची नेमणूक केल्याचा आरोप जेजुरी ग्रामस्थांनी केला आहे. त्या विरोधात मागील काही दिवसापासून आंदोलनही सुरू केले आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी आज दिवटी आणि मशाली पेटवून निषेध करण्यात आला आहे. आता सरकार याबाबत काय भूमिका घेते हे पहावे लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर