केवळ २४ तासात लक्ष्मीविलास बँकेमधून ग्राहकांनी काढले १० कोटींपेक्षा जास्त रुपये

नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर २०२०: बुधवारी लक्ष्मी विलास बँकेमधून पैसे काढण्याच्या मर्यादेनंतर बँकेच्या विविध शाखांमध्ये ग्राहकांची गर्दी झाली होती. अवघ्या २४ तासात बँकेतून १० कोटींपेक्षा जास्त रुपये काढले गेले आहेत. दुसरीकडं, आरबीआयनं नियुक्त केलेल्या बँकेच्या प्रशासकानं म्हटलं आहे की, डीबीएस बँकेमध्ये विलीन झाल्यानंतर कोणत्याही कर्मचार्‍याला कामावरून वजा करण्यात येणार नाही, सर्व ४,००० कर्मचाऱ्यांना सामील करून घेतलं जाईल.

महत्त्वाचं म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेनं मंगळवारी दक्षिण भारत केंद्रित लक्ष्मी विलास बँकेला एक महिन्याभराच्या मोरेटोरियम मध्ये टाकलं आहे. असं म्हटलं जात होतं की कोणताही ग्राहक पुढील एक महिन्यासाठी २५ हजार रुपयांहून अधिक रक्कम बँकेतून काढू शकणार नाही. ही बातमी समजताच ग्राहकांमध्ये चिंता वाढली आणि लक्ष्मीविलास बँकेच्या विविध शाखांसमोर गर्दी वाढली.

अफवांमुळं अडचणी वाढल्या

लोकांमध्ये पसरलेल्या भीतीच्या वातावरणामुळं लोकांनी विविध शाखां समोर गर्दी करण्यास सुरुवात केली, त्यामुळं बँकांच्या शाखांवर प्रचंड दबाव आहे, असं बँक प्रशासक टीएन मनोहरन यांनी बुधवारी सांगितलं. अफवामुळं ग्राहक पैसे काढत आहेत. ते म्हणाले की बँक शाखांमधून पैसे काढण्यास आणखी वेग येऊ शकतो आणि दबाव वाढू शकतो. हे पाहता बँक ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग व्यक्ती इत्यादींसाठी खास काउंटर बनविण्याचा विचार करीत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा