गोल पोस्ट आरोग्य माढा तालुक्यात कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव रूग्णांची संख्या गेली ७ वर

माढा तालुक्यात कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव रूग्णांची संख्या गेली ७ वर

माढा (सोलापूर), दि. ८ जुलै २०२०: माढा तालुक्यात मागील १० दिवसापूर्वी एकही रूग्ण नसताना या आठवड्यात कोरोनाचा प्रभाव वाढत चालला असून यात ७ रुग्णांची भर पडली आहे.

३ दिवसात माढा तालुक्यात ७ रुग्ण सापडले आहेत, लोकडॉऊनच्या शिथिल होत आहे तस तसे लोकांमधील कोरोनाबाबतचे गांभीर्य कमी होताना दिसत आहे, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक करत नसून प्रशासनाने आता याविरूध्द कंबर कसली आहे. दगड अकोले ३ रिधोरे २ भोसरे २ असे रुग्ण सापडले आहेत.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या कार्यालायत येणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे, सर्वांनी काळजी घ्यावी, अनावश्यक लोकांचा संपर्क टाळावा, कार्यालयात मास्क शिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये, कामाशिवाय ऑफिस कडे येऊ नये, ऑफिसमध्ये संपर्कासाठी खिडकी योजनेचा वापर करावा आपला निष्काळजीपणा आपल्या कुटूंबाला धोक्यात घालू शकतो, सतर्क राहा…

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version