महाराष्ट्रात “शक्ती” विधेयक कायदा, बलात्कार करण्यार्यांना मिळणार “फाशी”….

मुंबई, १० डिसेंबर २०२०: महाराष्ट्रात राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती विधेयक तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. महिलांवर अत्याचार करण्यार्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठोवण्याची तसेच मुलींना सोशल मिडियावरून त्रास देणार्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आता हे राज्याच्या अधिवेशनात प्रस्ताव मंजुरी साठी ठेवण्यात येईल.

“शक्ती” कायद्यात काय काय तरतुदी…….

बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा अत्यंत दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात फाशी शिक्षा तरतुदी, अथवा जन्मठेप आणि दंड.

ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतुद.

अतिशय क्रुर अत्याचार प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा.

सामुहिक बलात्कार-२० वर्ष कठोर जन्मठेपेची शिक्षेची तरतूद,मरेपर्यंत जन्मठेप १० लाख रूपये दंडाची किंवा मृत्यूदंडाची शिक्षा.

१६ पेक्षा कमी वय वर्ष आसलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा.

१२ वर्षाखालील मुलीवर अत्याचार प्रकरणात मरेपर्यंत कठोर जन्मठेपेची शिक्षा आणि १० लाख रूपये दंड.

सगळे गुन्हे अजामीनपात्र,बलात्कार तपासाला सहकार्य न करणार्या सरकारी सेवकाला २ वर्ष तुरुंगाची शिक्षा आणि दंड

एॅसिड हल्ला केल्यास १० वर्षाची शिक्षा तसेच मरेपर्यंत जन्मठेप पिडित व्यक्तीला दंड स्वरूप रक्कम.

एॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास १४ वर्षाचा तुरुंगवास.

महिलेचा कोणत्याही पद्धतीने छळ केल्यास २ वर्ष तुरुंगाची व १ लाख रूपये दंडाची शिक्षा.

पुन्हा पुन्हा महिलेवर अत्याचार करण्यार्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप.

सोशल मिडियावर, धमकी, कमेंट चुकीची माहिती पसरवल्यास शिक्षा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा