गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय मालीमध्ये सशस्त्र तरुणाने केला तांडव, अंदाधुंद गोळीबार करत 20 जणांची केली हत्या

मालीमध्ये सशस्त्र तरुणाने केला तांडव, अंदाधुंद गोळीबार करत 20 जणांची केली हत्या

माली, 20 जून 2022: पश्चिम आफ्रिकेतील माली येथे एका सशस्त्र व्यक्तीने 20 जणांची हत्या केली आहे. एक व्यक्ती शस्त्र घेऊन आल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याने लोकांवर अंदाधुंद गोळ्या झाडायला सुरुवात केली. या हल्ल्यात 20 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोक इकडं तिकडं धावताना दिसत होते.

प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान लोकांमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

यापूर्वी अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे गोळीबाराची घटना घडली होती. तुलसा, ओक्लाहोमा येथील हॉस्पिटल कॅम्पस इमारतीत झालेल्या गोळीबारात चार जण ठार झाले. येथे एका व्यक्तीने बंदूक घेऊन मेडिकल ऑफिसच्या इमारतीत घुसून गोळीबार केला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःचाही जीव घेतल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तर मे महिन्यात अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबाराची घटना समोर आली होती. यामध्ये 19 विद्यार्थ्यांसह 23 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 2 शिक्षकांचाही सहभाग होता. यापूर्वी मे महिन्यात बफेलोच्या सुपरमार्केटमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. येथे एका गोर्‍या माणसाने गोळीबार केला होता. त्यात 10 कृष्णवर्णीयांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version