गोल पोस्ट इतर मुझफ्फरपूरमध्ये आग लागून एकाच कुटुंबातील ५ मुलींचा होरपळून मृत्यू तर ४ जण...

मुझफ्फरपूरमध्ये आग लागून एकाच कुटुंबातील ५ मुलींचा होरपळून मृत्यू तर ४ जण गांभीर जखमी

बिहार, २ मे २०२३: बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एक वेदनादायक दुर्घटना घडली. येथे सोमवारी रात्री उशिरा एकाच कुटुंबातील पाच मुलींचा आगीत होरपळून मृत्यू झाला. सर्व जण जेवण करून झोपले असताना घराला आग लागली. दरम्यान आगीत होरपळून मुलींचा मृत्यू झाला. या आगीत घरातील सर्व सामान जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. सदर पोलिस स्टेशन हद्दीतील रामदयाळू स्टेशनजवळ ही घटना घडली.

या अपघातात ६ वर्षांची शिवानी, १२ वर्षांची अमृता कुमारी, ८ वर्षांची कविता, १७ वर्षांची सोनी कुमारी आणि १७ वर्षांची मनीषा अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. राकेश राम यांची पत्नी बेबी देवी,४ वर्षांचा आकाश, सात वर्षांचा विकास आणि ८ महिन्यांचा मुलगा प्रकाश हे गंभीररित्या भाजले आहेत.

त्यांच्यावर एसकेएमसीएचमध्ये उपचार सुरू आहेत. येथे अपघातात जीव गमावलेल्या मुलींचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेबाबत राकेश राम यांनी सांगितले की, घरातील सर्व लोक झोपले होते. त्यानंतर अचानक आग लागली.यानंतर त्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते आणि मुलींची जळून खाक झाली होती.

न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version