गोल पोस्ट इतर नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले ‘छत्रपती संभाजीनगर रोड’ नामकरण

नाशिकमध्ये औरंगाबाद रोडचे झाले ‘छत्रपती संभाजीनगर रोड’ नामकरण

नाशिक, ४ मार्च २०२३ : औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करण्यात आले असले तरीदेखील नाशिकमधील रस्त्यांवर, दिशादर्शक फलकांवर जुनीच नावे असल्याची बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील अशा मार्गांवर ‘छत्रपती सभाजीनगर रोड’ असे दिशादर्शक फलक लावले. या फलकांचे अनावरण ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी होत होती. अखेर औरंगाबादचे ‘छत्रपती सभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर झाले; मात्र नाशिक शहरात पंचवटी परिसरात अजूनही ‘औरंगाबाद रोड’ असेच फलक असून, उच्चारही तसाच केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे यांनी याची गांभीर्याने दखल घेत नवीन आडगाव नाका येथील भागात ‘छत्रपती संभाजीनगर रोड’ असे दिशादर्शक फलक लावले.

यावेळी शहर सरचिटणीस संजय खैरनार, शंकर मोकल, आमर तांबे, ज्ञानेश्वर जाधव, जयवंत गोडसे, सागर तांबे, नीलेश जाधव, राम शिंदे, राज रंधवा, सागर पुरकर, सचिन अहिरे, महेश जाधव, रवी सोमसे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version