नाशिक, दि.१५ मे २०२० :सध्या लॉक डाऊनमुळे सर्वच गोष्टींचा तुटवडा जाणवू लागला आहे.त्यात व्यसनी लोकांचेही फार अवघड झाले आहे. तंबाखू खाणाऱ्यांचे यामुळे चांगलेच वांदे झाले आहे. नाशिक जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे.तंबाखू न दिल्याने मित्रानेच मित्राला मारहाण केली आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथे ही घटना घडली आहे. त्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संबंधित मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तंबाखूच्या एका पुडीची किंमत ६० ते ७० रुपयांपर्यंत गेली आहे. तरी देखील काही लोकांचं तंबाखू व्यसन सुटत नसल्याचे आपण पाहतो. त्यातूनच अशा घटना समोर येत आहेत. याच व्यसनातून दोन मित्रांमध्ये तुफान हाणामारी झाली. एका पुडीसाठी मित्रानेच मित्राला इतर काही जणांना सोबत घेवून मारहाण केली.तंबाखूच्या पुडीवरुन मित्रांमध्ये वाद झाल्यामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे परंतू , तेवढाच विचार करायला लावणारी सुद्धा ही गोष्ट आहे.
याअगोदर सोशल मीडियावर तंबाखूच्या पुडीशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक तरुण लॉकडाऊनदरम्यान तंबाखू खरेदीसाठी घराबाहेर पडला होता. त्याचवेळी तो तरुण पोलिसांच्या ताब्यात सापडतो. लॉकडाऊनदरम्यान घराबाहेर का पडला? असं विचारल्यावर तरुण तंबाखूच्या पुडीचं कारण देतो. त्यामुळे पोलीसांनी त्याला चांगलाच चोप दिला होता. अशा घटनांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: