उत्तर भारतात तापमान ४० अंशाच्याही पुढे

नवी दिल्ली, १६ एप्रिल २०२३: मध्य भारताबरोबर उत्तर भारतातही उष्णतेची लाट सुरू झाली असून पुढील पाच दिवस अनेक राज्यांत गरम वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राजधानी दिल्लीत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.

उत्तर भारतात बहुतांश भागात पुढील चार ते पाच दिवस तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. पूर्व, उत्तर पश्चिम आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंश सेल्सिअसने जास्त राहील. दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात फरीदाबादमध्ये शनिवारी सर्वाधिक ४३.१ अंश इतके तापमान नोंदवले गेले.

याशिवाय नोएडा येथे ४०.८ अंश सेल्सिअस, गुरुग्राम येथे ४१, गाझियाबाद येथे ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशात प्रयागराज,येथे सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सिअस तर आग्रा येथे ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा