एक दिवसीय सामन्यांमध्ये सुपर ओवर न घेता दोन्ही संघांना विजयी घोषित करावे: टेलर

नवी दिल्ली, दि. २६ जून २०२० : न्यूझीलंडचा ज्येष्ठ फलंदाज रॉस टेलरने म्हटले आहे की, पन्नास षटकांच्या एक दिवसीय खेळामध्ये जर सामना समान गुण पातळीवर येऊन थांबला असेल तर अशा वेळेस सुपर ओवर न घेता सामन्याची ट्रॉफी दोन्ही संघांनी सामायिक करून घ्यावी.

गेल्या वर्षी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना टाय आणि सुपर ओव्हर बरोबरीनंतर ‘काऊंटिंग ऑफ बाऊंड्री’ नंतर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले होते. या नियमाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) वर कडक टीका झाली. यानंतर आयसीसीला नियम बदलावे लागले, त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यात विजेता ठरवण्यासाठी सलग सुपर ओव्हर खेळण्याची तरतूद आहे. पण सामना बरोबरीत असताना ट्रॉफी सामायिक करावी, असे टेलरचे मत आहे.

टेलरने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, “मी वनडेमध्ये सुपर षटकांपेक्षा अजूनही दुविधेेमध्ये आहे. एक दिवसीय सामना हा पन्नास षटकांचा असल्यामुळे खेळाचा कालावधी खूप मोठा होतो आणि मला असे वाटते की जर मॅच टाय झाली असेल तर त्या मॅचचा टाय शेवट मध्येच झालेला मला आवडेल ‘

पुढे ते म्हणाले की, ‘टी२० सारख्या सामन्यांमध्ये सुपर ओव्हर असणे ठीक आहे कारण या सामन्यांमध्ये मैदानावर खेळाडू खेळण्यासाठी जास्त वेळ नसतात त्यामुळे निश्चित विजेता जाहीर करण्यासाठी थोड्या वर पुढे वाढवल्या जाऊ शकतात. परंतु मला असे वाटत नाही ही एकदिवसीय सामन्यांमध्ये सुपर ओवर असाव्यात. एकदिवसीय सामन्यांमध्ये जर मॅच समान गुणांवर घेऊन थांबले असेल तर दोन्ही संघ विजयी घोषित करण्यास मला तरी काही हरकत वाटत नाही.’

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा