परळीत तुफान राडा, दोन गटांतील तुंबळ हाणामारीत एक ठार

बीड २२ जून २०२३: परळीत दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीने आज तुफान राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना, कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर घडली आहे. एका लग्न समारंभात हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. दोन गटांत अचानक वाद झाला, हा वाद मारामारीपर्यत पोहचला. एकमेकांवर प्रत्येकजण अक्षरशः तुटून पडले, यामध्ये एक जण ठार झाला. अल्लाउद्दीन शेख असे मृत व्यक्तींचे नाव असुन नागपूरचा राहणारा आहे.

दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला होता. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. या मारामारीत मयत झालेल्या इसमाची नागापूर येथे पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा