पुणे, दि. ३ मे २०२०: कोरोनाचा तिसरा टप्पा हा उद्यापासून सुरू होत आहे आणि तो १७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. काल केंद्र सरकारने नवीन आदेश काढले, यामध्ये ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन यांसाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानंतर आता राज्य सरकारने देखील नवीन आदेश काढले आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भाग आणि मुंबई महानगरपालिका भाग हे भाग बंद राहणार आहेत.
१७ मे पर्यंत राहणार बंद:
यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की पुणे शहर आधी प्रमाणेच बंद राहणार आहे. ३ मे पासून ते १७ मे पर्यंत लॉकडाऊनचा तिसरा टप्पा असणार आहे, तोपर्यंत हे सर्व नियम लागू राहतील. आत्तापर्यंत पुण्यामध्ये ३३० चौरस किलोमीटर पैकी ८१ चौरस किलोमीटर पर्यंत भाग हा प्रतिबंध (रेड झोन) केला गेला होता. आता हा रेड झोन छोट्या छोट्या भागांमध्ये विभागला जाणार आहे. त्यानुसार हळू हळू प्रतिबंधित भाग शिथिल केले जातील.
१७ मे नंतरही काही भाग राहू शकतो प्रतिबंधित:
सध्या प्रतिबंधित असलेल्या भागांची आज छाननी होणार होती. त्यानुसार हे प्रतिबंधित भाग ठराविक वस्त्यांपर्यंत किंवा भागांपर्यंत मर्यादित राहील. त्यामुळे प्रतिबंधित भाग २० ते २५ चौरस किलोमीटर पर्यंत कमी होऊ शकतो. म्हणजेच जवळपास दहा टक्के भाग हा प्रतिबंधित राहू शकतो. जो १७ मे नंतर ही पुढे प्रतिबंधित राहण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी