पुण्यात विद्यार्थ्यांने प्राध्यापिकेला ब्लँकमेल करुन मागितली खंडणी

5

पुणे २५ जून २०२३: पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित महाविद्यालयातील ३६ वर्षीय प्राध्यापिकेचा विवस्त्र व्हिडिओ, फोटो काढून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, तिच्या पतीकडे पाच हजार यूएस डॉलर्सची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार एका विद्यार्थ्याने केलाय. याप्रकरणी बिहार येथील एका विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार जून महिन्यात घडला आहे. तक्रारदार महिला या एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम करतात. त्यांचा विद्यार्थी मयांक सिंग याने त्यांच्याशी सतत इन्स्टाग्रामवर संपर्कात राहून मैत्री वाढविण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर या महिलेच्या इच्छेविरुद्ध मोबाईलवर व्हिडिओ व फोटो काढले आणि नंतर महिलेला फोन करून ब्लँकमेल करु लागला.

नंतर त्याने महिलेच्या पतीस हा व्हिडिओ व फोटो पाठवले आणि त्यांच्याकडे पाच हजार यूएस डॉलर्सची मागणी करुन पैसे दिले नाही तर न्युड व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत हडपसर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस. गांधले पुढील तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा