पुण्यात चोरट्यांचा धुडगूस, ११ लाखांचा ऐवज केला लंपास

पुणे, २३ ऑगस्ट २०२०: गणेशोत्सव सणाचा पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बिल्डिंग मधील बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सदाशिव पेठेसह आंबेगाव बुद्रूकमध्ये तब्बल ११ लाखांचा ऐवज चोरुन नेले आहे. सदाशिव पेठेतील विजयानगर येथून ६ लाख ३१ हजार रुपयांचे ऐवज तर आंबेगाव बुद्रूकमधून ४ लाख ४५ हजारांची चोरी करण्यात आली.

सदाशिव पेठेतील विजयानगर कॉलनीतील रहिवासी आशुतोष गांधी (वय ३५) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी यांचा दिनार अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. काल मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून १ लाख ५८ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने मिळून ६ लाख ३१ हजारांचा ऐवज चोरुन घेवून गेले.

त्याशिवाय घरातून मोटारीची चावी घेउन पार्किंगमधील मोटार चोरुन नेली आहे. याप्रकरणी सतीश कमलेकर (वय ४५) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सतीश हे जांभुळवाडी रोडवरील जाई अपार्टमेंट येथे दुसऱ्या मजल्यावर राहतात. दोन दिवसांपुर्वी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील दागिने व रोकड ताब्यात घेतली. त्यानंतर चोरट्यांनी सतीश यांच्या घरातून मोटारीची चावी घेऊन पार्किंगमधील मोटार चोरुन नेली आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळे तपास करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा