जयपूर, १४ जुलै २०२१: देशात कोरोनाव्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट कमी झाली असेल, परंतु कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरीएंटमुळे देखील चिंता वाढली आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस नंतर आता कोरोनाचा कप्पा व्हेरीएंट समोर आलाय. राजस्थानमध्ये आतापर्यंत कप्पा व्हेरिएंटचे ११ रुग्ण आढळून आले असून यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. रघु शर्मा म्हणाले की, राजस्थानमध्ये आतापर्यंत कप्पा व्हेरीएंट मधील ११ रुग्ण आढळले आहेत. त्यांनी सांगितले की ११ रुग्णांपैकी ४-४ रुग्ण जयपूर व अलवर येथील आहेत. दोन रूग्ण बाडमेर व एक भीलवाडा येथील आहेत. डॉ रघु शर्मा म्हणाले की, डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कप्पा प्रकार कमी प्राणघातक आहे. त्यांनी कोविड एप्रोप्रिएट बिहेवियरचे अनुसरण करण्याचे आवाहन केले आहे.
१३ जुलैपर्यंत राजस्थानात कोरोनाचे ९.५३ लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी, गेल्या २४ तासांत येथे २८ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ९.४३ लाखांहून अधिक बरे झाले आहेत. तर ८,९४५ लोकांचा मृत्यू झालाय.
– कोणत्या अर्थाने व्हेरीएंट अधिक धोकादायक आहे?
– डेल्टा व्हेरिएंट: वेगाने लोकांना संक्रमित करते.
– कप्पा व्हेरिएंट: लोकांना वेगाने संक्रमित करते आणि वेगाने पसरते.
– अल्फा व्हेरिएंट: सामान्य नॉवेल कोरोना व्हायरसपेक्षा वेगवान पसरते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे