सिक्कीम राज्यात पाच दिवसांचा आठवडा रद्द

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नाखूष असल्याने सिक्कीम सरकारने पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे.
५ दिवसांच्या आठवड्याची सुविधा पूर्णपणे रद्द करण्यात आली असून दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत मुख्य सचिव एस.सी. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२० पासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गतवर्षी मे महिन्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग यांनी सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला होता.
राज्यातील सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी मिळणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा